महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कार्यकर्तापद कोणी हिरावू शकत नाही', डावलल्याची सुशील कुमारांना खंत - नितीश कुमार मुख्यमंत्री

बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांची निवड झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. सुशील कुमार मोदी यांनी ट्विट करून अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली आहे.

सुशील कुमार मोदी
सुशील कुमार मोदी

By

Published : Nov 15, 2020, 6:11 PM IST

पाटणा - बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांची निवड झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. भाजपने बिहार राज्यात नेतृत्व बदल करण्याचे संकेत आधीच दिले आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची भाजपचे विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री पदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका ट्विटवरून ते नाराज असल्याचे दिसून येत आहे.

सुशील कुमार मोदी यांनी एक ट्विट केले आहे. 'भाजप आणि संघपरिवाराने मागील ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मला जेवढं दिलं तेवढ कदाचित दुसऱ्या एखाद्याला मिळालं असेल. यापुढेही जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेल. कार्यकर्त्याचे पद तर कोणी हिरावू शकत नाही', असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद काढून घेतले असले तरी कार्यकर्त्याचे पद कोणी काढून घेऊ शकत नाही, असे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सूचित केले आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी जेडीयूचे नेते नितीश कुमार यांना आज (रविवार) सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. काल नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) १२५ आमदारांची यादी घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. नितीश कुमार सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र लढवली. एनडीएत सर्वात जास्त जागा भाजपाला मिळाल्या तर जेडीयूला फक्त ४३ जागा मिळाल्या. त्यामुळे महत्त्वाच्या खात्यांवर भाजपा दावा सांगण्याची शक्यता आहे. राज्यात जेडीयूचा जनाधार कमी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची इच्छा नसल्याचेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, भाजपने आग्रह केल्यामुळे मुख्यमंत्री पद स्वीकारत असल्याचे त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details