नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज (शनिवार) आपला निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अयोध्या प्रकरण : आज होणार निकाल जाहीर! - Ayodhya matter
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी १०:३० पासून याप्रकरणी सुनावणीस सुरुवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने, १६ ऑक्टोबरला याप्रकरणीचा निकाल राखून ठेवला होता.
१७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच याप्रकरणी निकाल जाहीर होणार याची सर्वांना खात्री होती. त्या पार्श्वभूमीवर देशभरात राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. उत्तर प्रदेश, अयोध्या या ठिकाणी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.