महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्या वाद; सर्वोच्च न्यायालयाने 3 महिने पुढे ढकलली सुनावणी - सुनावणी

अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची समिती नेमली आहे. मध्यस्थांच्या समितीने वेळ मागून घेतल्याने अयोध्या प्रकरणाची सुनावणी 3 महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : May 10, 2019, 1:50 PM IST

नवी दिल्ली - अयोध्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या मुद्द्यावरील सुनावणी 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांच्या समितीची नेमणूक केली आहे. मध्यस्थांच्या समितीने वेळ मागून घेतल्याने अयोध्या प्रकरणाची सुनावणी 3 महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अयोध्या वादावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी 8 मार्चला झालेल्या सुनावणीत माजी न्यायाधीश एफ. एम. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थांची समिती नेमली होती. या समितीत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हेही आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह एस. ए. बोबडे, एस. ए. नझीर, अशोक भूषण आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठापुढे सुनावणी झाली.

यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, मध्यस्थांच्या समितीला 15 ऑगस्टपर्यंत वेळ हवा आहे. आम्ही समितीचा 7 मेचा अहवाल वाचला आहे. समितीचा निर्णय जर सर्व पक्षकारांना मान्य असेल तर सर्वोच्च न्यायालय औपचारीक निर्णय देऊ शकते. अन्यथा अयोध्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details