महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नौदलात महिला कमिशन निर्माण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील - महिला कमिशन नौदल

नौदलात महिलाही पुरूष अधिकाऱ्यांप्रमाणेच उत्कृष्ट काम करू शकतात. महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्याची गरज नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 17, 2020, 11:27 AM IST

नवी दिल्ली - नौदलात कायम स्वरूपी महिला कमिशन( आयोग) निर्माण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील दाखवला आहे. नौदलात महिलाही पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच उत्कृष्ट काम करू शकतात. महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्याची गरज नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

नौदलात महिला अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. महिला आयोगाला परवानगी मिळाल्यामुळे पुरुषांप्रमाणेच महिलांनाही सर्व लाभ मिळणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details