नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा पवनने केला होता. यासंबधीची एक याचिका न्यायालयाने आधीच फेटाळली होती. मात्र, आता पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली होती. ती आज न्यायालयाने फेटाळली.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना उद्या २० मार्चाला फाशी देण्यात येणार आहे. मात्र, आरोपींनी कायदेशीर मार्गांचा वापर करत ३ वेळा डेथ वॉरंट रद्द केला. त्यामुळे तिन्ही वेळा फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. न्यायालयाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात चौघांना फाशी देण्यात येणार आहे.