नवी दिल्ली - गुजरातमधील राज्यसभेच्या २ जागांसाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र्य निवडणुका घेण्याचा निर्यण घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सध्या न्यायालयाने नकार दिला आहे.
काँग्रेसला गुजरातमध्ये झटका; राज्यसभेच्या २ जागांसाठी होणार स्वतंत्र निवडणुका - नवी दिल्ली
गुजरातमधील राज्यसभेच्या २ जागांसाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र्य निवडणुका घेण्याचा निर्यण घेतला होता. या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र निवडणुका घेण्याचा निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते परेशभाई धनानी यांनी याचिका दाखल केली होती. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश बी. आर गवई यांच्या पीठाने गुजरात काँग्रेसला दोन्ही जागांवर निवडणुका झाल्यानंतर याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
अमित शाह आणि स्मृती इराणी लोकसभा निवडणुकीत निवडुन आल्यानंतर गुजरातमधील राज्यसभेच्या २ जागा रिकाम्या झाल्या आहेत. या जागेसाठी भाजपने संरक्षणमंत्री एस. जयशंकर आणि जे एम ठाकोर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.