नवी दिल्ली - 'इलेक्टोरल बॉन्ड'च्या माध्यातून मिळालेल्या देणगीचा तपशील निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना दिले आहेत. देणगी देणाऱ्यांची ओळख आणि त्यांच्या खात्यांमध्ये जमा असलेल्या पैशांचा हिशोबही सर्वोच्च न्यायालयाने मागितला आहे. हा तपशील ३० मे पर्यंत बंद पाकिटात द्यावा, असे निर्देशही न्यायालायने दिले आहेत.
एका संघटनेने इलेक्टोरल बॉन्डच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरुन त्यांनी सर्वोच्च न्यायालायमध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालायने सुनावणी करत हे निर्देश दिले आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायाने या याचिकेवर आपला पक्ष राखून ठेवला होता.
पुढील आदेश मिळेपर्यंत इलोक्टरोल बॉन्डचा तपशील बंद पाकिटातच ठेवावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालायने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर राजकीय पक्षांच्या देणगीच्या कायद्यामध्ये झालेल्या बदलाचे न्यायालय परीक्षण करणार आहे. त्यावरुन हा कायदा कोणत्या पक्षाच्या हिताची रक्षा करत आहे का, हे तपासून पाहणार आहे.