अगरतळा -आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्रिपुरा भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्रिपुरा भाजपचे उपाध्यक्ष सुबल भौमिक यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजपच्या प्रथमिक सदस्यत्वालाही रामराम ठोकला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला धक्का; त्रिपुरा उपाध्यक्षांचा पक्षाला रामराम - election2019
सुबल भौमिक यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.
सुबल भौमिक हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये सामिल होणार आहेत. बुधवारी खुम्पुई येथे होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेमध्ये ते प्रवेश घेऊ शकतात. राहुल गांधी त्यांना पश्चिम त्रिपुरा येथून उमेदवारी देऊ शकतात, अशी चर्चा आहे. भौमिक यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना संपूर्ण पक्षात ओळखले जात होते.
मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. माझे अनेक समर्थक मला काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचे सांगत होते, असे सुबल भौमिक यांनी सांगितले. आपण उद्या खुमुलवंग येथे राहुल गांधींच्या सभेमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, असेही ते म्हणाले.