नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांनी आज गुरुवारीदेखील धरणे आंदोलन केले. जेएनयूमधील वाढलेले प्रवेश शुल्क, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मनुष्यबळ मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन; जेएनयू वाढीव प्रवेश शुल्कसह सीएएचा विरोध
जेएनयूतील वाढलेला प्रवेश शुल्क हा विषय या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजप सरकार, आरएसएस आणि एबीव्हीपी विरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जेएनयूतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
आज परत जेएनयूतील वाढलेला प्रवेश शुल्क हा विषय या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजप सरकार, आरएसएस आणि एबीव्हीपी विरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जेएनयूतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, समर्थन देण्यासाठी इतर विद्यापीठातील विद्यार्थी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी आंदोलन सुरू असताना मनुष्यबळ मंत्रालयाचे सचिव अमित खरे व जेएनयू विद्यार्थ्यी संघटनेच्या दरम्यान बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा-'देशाची अवस्था बिकट, हिंसाचारही वाढला'