नवी दिल्ली -भारतीय रेल्वेचे खासगीकरण झाल्यानंतर होणारी भाडेवाढ आणि वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे संसदेच्या बाहेर विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आहेत.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करताना विद्यार्थी म्हणाले, रेल्वेचे खासगीकरण करण्याचे पाऊल गरीब जनतेविरोधात आहे. खासगीकरणामुळे केवळ काही लोकांनाच फायदा होणार आहे. रेल्वेचा सर्वात जास्त फायदा हा मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना झाला पाहिजे. कारण, हेच लोक सर्वात जास्त रेल्वेने प्रवास करतात.
जेएनयू विद्यार्थी प्रतिक्रिया देताना म्हटले, सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी आम्ही आलो आहोत. भारतीय रेल्वेला सरकारमार्फत विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. रेल्वेचे खासगीकरण झाल्यास भाडेवाढ होईल. लोकांची सेवा करणारी रेल्वे नंतर नफा कमवण्याचे साधन होऊन जाईल.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत रेल्वेच्या खासगीकरणाबाबत स्पष्टोक्ती देताना म्हटले आहे, की भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ काही विभागांना कॉर्पोराईट करण्यात येणार आहे. परंतु, तरीही या निर्णयाविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत.