महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आगीशी खेळणे थांबवा, मेहबूबा मुफ्तींचा भाजपला इशारा - article 370

'लोकसभा निवडणुकांनंतर भाजपने सत्तेत आल्यानंतर ३७० आणि ३५ए रद्द केल्यास फक्त काश्मीरच नाही, तर संपूर्ण देश पेटेल,' असा इशारा मेहबूबा यांनी दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती

By

Published : Apr 9, 2019, 1:01 PM IST

श्रीनगर - भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरशी संबंधित संविधानातील कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर पीडीपी (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती भडकल्या आहेत. त्यांनी भाजपला 'आगीशी खेळणे थांबवा' असा कडक इशारा दिला आहे.

'लोकसभा निवडणुकांनंतर भाजपने सत्तेत आल्यानंतर ३७० आणि ३५ए रद्द केल्यास फक्त काश्मीरच नाही, तर संपूर्ण देश पेटेल. जम्मू-काश्मीर आधीपासूनच तोफेच्या तोंडाशी आहे. तेथे दारूगोळा आणि खूनखराब्याशिवाय एक दिवस गेलेला नाही. पण 'हे' घडले तर, फक्त काश्मीरच नाही तर, संपूर्ण देशात आगडोंब उसळेल. त्यामुळे भाजपने कृपा करून आगीशी खेळणे थांबवावे,' असा इशारा मेहबूबा यांनी दिला आहे.

भाजपने सोमवारी त्यांचा निवडणूक जाहीरनामा 'संकल्प पत्र' जाहीर केला. यामध्ये ३७० आणि ३५ए ही दोन आर्टिकल्स रद्द करू, असे आश्वासन दिले होते. आर्टिकल ३७० ने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. तर, ३५ए ने तेथील नागरिकांना काही विशेष अधिकार दिले आहेत. या दोन्ही आर्टिकल्सना आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details