महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...' - राजनाथ सिंह

राफेलची पूजा केल्यावरून राजनाथ सिंह यांच्यावर काँग्रेसमधून टीकेची झोड उठली होती. यावर बोलताना, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हरियाणामध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

Rajnath Singh in Haryana

By

Published : Oct 13, 2019, 12:56 PM IST

चंदिगड - मी राफेल विमानावर 'ओम' लिहिले, तसेच त्याला 'रक्षा बंधन' बांधले, तर इकडे काँग्रेस नेत्यांनी त्यावर वाद सुरू केला. त्यांनी राफेलचे स्वागत करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पाकिस्तानला बळ मिळते, अशी टीका राजनाथ सिंह यांनी आज केली, ते हरियाणाच्या कर्नालमधील प्रचारसभेत बोलत होते.

बालाकोटच्या एअर स्ट्राईकवेळी आपल्याकडे राफेल असते, तर आपण भारतात बसून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करू शकलो असतो. आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसण्याची देखील गरज पडली नसती, असेदेखील राजनाथ सिंह यावेळी म्हटले.
याआधी बोलताना, त्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. याआधीचे हरियाणाचे सर्व मुख्यमंत्री हे दिल्लीतून कारभार पाहत, मात्र मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे हरियाणामध्ये राहून हरियाणाचा विकास करत आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
हरियाणामध्ये सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होईल, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details