महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नागपूरहून 1 हजार मजुरांना घेऊन विशेष रेल्वे मुझफ्फरपूरमध्ये दाखल

गुरुवारी नागपूरहून 1 हजार कामगारांना घेऊन विशेष रेल्वे मुझफ्फरपूरला पोहोचली. राज्यात पोहोचल्यावर कामगारांनी त्यांच्या आनंद व्यक्त केला.

special train
विशेष रेल्वे

By

Published : May 8, 2020, 1:21 PM IST

मुजफ्फरपूर- लॉकडाऊन दरम्यान देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील नागपूरहून एक विशेष श्रमिक रेल्वे 1 हजार कामगारांना घेऊन मुझफ्फरपूरला पोहोचली. या मजुरांनी गावात पोहोचल्यावर आनंद व्यक्त केला.

नागपूरहून 1 हजार मजुरांना घेऊन विशेष रेल्वे मुझफ्फरपूरमध्ये दाखल

स्पेशल रेल्वे स्थानकावर पोहोचताच जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक स्थानकावर दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. या दरम्यान त्यांनी काही प्रवाशांशी संवाद साधला. याव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाने सर्व कामगारांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात स्थापन केलेल्या क्वारंटाईन केंद्रात राहण्याचे आदेश दिले आहेत.

घरी पोहोचलेले कामगार म्हणाले की, आम्ही आमच्या मातीत आलो याचा आम्हाला फार आनंद झाला आहे. आम्हाला त्या ठिकाणी अन्न मिळत नव्हते. परंतु, आता घरी जायला मिळत आहे, याचा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करु शकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details