बंगळुरु- कोरोनामुळे देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात बस, ट्रेन आणि सर्व वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, लष्कराच्या जवानांसाठी एका विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे बंगळुरूमधून काश्मीरला जाणार आहे.
लष्कराच्या जवानांसाठी विशेष रेल्वे - कोरोना बातमी, कोरोना संसर्ग
प्रशिक्षण पूर्ण झालेल्या लष्कराच्या 950 जवानांना घेवून ही रेल्वे जाणार आहे. बंगळुरू, बेळगाव आणि हैदराबादमधील सिकंदराबाद येथील जवान सेवेवर रुजू होण्यासाठी जाणार आहेत.
प्रशिक्षण पूर्ण झालेल्या लष्कराच्या 950 जवानांना घेवून ही रेल्वे जाणार आहे. बंगळुरू, बेळगाव आणि हैदराबादमधील सिकंदराबाद येथील जवान सेवेवर रुजू होण्यासाठी जाणार आहेत. सामाजिक अंतर पाळत सर्व जवान रेल्वे स्टेशनवर आले होते. प्रवासाला जाण्याआधी रेल्वे डब्यांचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच स्टेशनमध्ये एंट्री करताना सॅनिटायझर टनेलही बनविण्यात आला आहे.
देशभरामध्ये आत्तापर्यंत 13 हजार 387 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील 1 हजार 749 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 437 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 एप्रिलपर्यंतचा पहिला लॉकडाऊनचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आले आहे.