जयपूर -कोरोनामुळेराजस्थानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विस्थापितांना भोजन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्यानंतर बाडमेर जिल्ह्यातील सर्व 297 पाकिस्तानी विस्थापित कुटुंबांना रेशन साहित्याचे वाटप केले जात आहे. तसेच पाकिस्तानच्या विस्थापित झालेल्या सुमारे 70% कुटुंबांना रेशन साहित्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या सुमारे 6000 पाकिस्तानी विस्थापित कुटुंबांना रेशन साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बाडमेरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी विस्थापित कुटुंबांना रेशन साहित्य वाटप केले जात आहे. जेणेकरून ते सर्यावजण कठीण काळात आपले जीवन जगू शकतील.
बाडमेरमध्ये पाकिस्तानहून विस्थापित झालेल्या 297 गरजू कुटुंबांना सरकारकडून रेशन साहित्य... हेही वाचा...सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक; चंदीगड प्रशासनाचे आदेश
कोरोना विषाणूच्या या कठीण काळात कोणीही उपाशी राहू नये, असा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा हेतू असल्याचे बाडमेरचे आमदार मेवाराम जैन यांनी सांगितले.या उद्देशाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यभर विस्थापित पाकिस्तानी कुटुंबांना रेशन साहित्य देण्याचे आदेश जारी केले आहेत.याच अनुषंगाने बाडमेरमध्ये अशी 297 कुटुंबे आहेत जी पाकिस्तानमधून विस्थापित झाली आहेत. ज्यांना अद्याप नागरिकत्व मिळालेले नाही. अशा कुटुंबांना रेशन साहित्य वाटप केले जात आहे.
यावेळी पाकिस्तानच्या विस्थापित लोकांबाबत व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरपतसिंग धारा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, 'सरकारच्या वतीने पाकिस्तानी विस्थापित कुटुंबांना रेशनिंग साहित्य पुरविले जात आहे. जिल्ह्यात अशी 297 अशी कुटुंबे आहेत ज्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. तथापि, त्यांनी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. ज्यामुळे प्रशासनाकडे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती आहे. मी स्वतः प्रशासनासह पाकिस्तानमधील विस्थापित कुटुंबांना रेशन सामग्रीचे वितरण करत आहे, असे त्यांनी सांगितले.