हैदराबाद - 'गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष'।। गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञान रुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. गुरुंचा हाच महिमा सांगत आहेत, भारतीय प्रशासन सेवा आणि पोलीस सेवेतील अधिकारी. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी यांना आपल्या गुरुंबद्दल बोलते केले आहे. कोणाला आई-वडिलांच्या कष्टातून-शिकवणीतून गुरु भेटले तर कोणाला शिक्षकांच्या एका प्रोत्सहनपर शब्दाने आयुष्याची दिशा मिळाली. महाराष्ट्राची माती आणि माणसं यांनाच काही एकलव्यांनी गुरु मानले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारी आणि नवं काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती मग ते आई-वडील, शिक्षक, पत्नी, मुलं, मित्र कोणीही असेल, पण त्यांच्याकडून चांगलं तेवढं घेण्याची वृत्ती जागृत ठेवून असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गुरुंबद्दलच्या भावना आणि त्यांच्या गुरुंची शिकवण ही महाराष्ट्रालाही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे. काय म्हणालेत हे अधिकारी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.
- महेश भागवत -प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे स्थान आणि महत्व अनन्यसाधारण असे असते. आज (रविवार) गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने तेलंगाणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले मराठमोळे अधिकारी महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'जवळ त्यांच्या गुरूंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
वाचा सविस्तर -गुरुपोर्णिमा विशेष : शाहा सरांच्या 'त्या' पत्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी - महेश भागवत
- सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते -कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करुन कसे पुढे जायचे याचे भान देणारे माझे आई-वडील, प्रोफेशनच्या स्तरावर माझे वरिष्ठ, मुलीसारखे प्रेम करणारे शिक्षक आणि काही मित्र-मैत्रिणी हे माझे गुरू राहिले.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते
- जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले -आई-वडिलांप्रमाणे शिक्षकांचा देखील आपल्या आयुष्यात गुरू म्हणून मोठा वाटा असतो. या गुरूंनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दाखवलेली वाट, शिकवण यामुळेच आपण आयुष्यात यशस्वी होत असतो. माझ्या आयुष्यात आई-वडिलांप्रमाणे माझे शिक्षक गुरुस्थानी आहेत.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडिलांप्रमाणे शिक्षक माझ्या गुरुस्थानी ' - डॉ. पंजाबराव उगले
- कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई -शाळेत असो किंवा कॉलेज ज्या ज्या ठिकाणी मी शिकलो त्या त्या ठिकाणी मी तेथील गुरुंचा आवडता शिष्य होतो. गुरुंचा आवडता असल्याने जबाबदारी सुद्धा वाढते आणि यातच माझ्या यशाचे गमक असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'शाळा-कॉलेजमध्ये मी गुरुंचा असायचो आवडता शिष्य' - जिल्हाधिकारी दौलत देसाई
- बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार -प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूच्या संदर्भाने दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा हा प्रत्येक व्यक्तीचे आई-वडील त्या व्यक्तीवर संस्कार करत असतात. आपल्या आयुष्यातील वाटचाल आई-वडील यांच्या संस्कारातूनच ठरतात. त्यामुळे माझे पहिले गुरू माझ्या आई वडील आहेत.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'माता अनं मातीच माझी गुरू' - पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार
- गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे -सर्वात जवळचे माझे गुरू मुकुल पाठक सर आहे. त्यांनी मला यूपीएससीला शिकवले. मी तयारी करत असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तू करू शकतेस, असे ते मला नेहमी सांगत. त्यामुळेच आज मी जिल्हाधिकारी बनू शकले, असे गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
वाचा सविस्तर -तस्मै श्री गुरवे नमः : ...म्हणून मी जिल्हाधिकारी होऊ शकले - डॉ. कादंबरी बलकवडे
- जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत -प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माझ्या आयुष्यात आतापर्यंतच्या वाटचालीत गुरू म्हणून आई-वडिलांचीच प्रमुख भूमिका राहिली आहे. हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. गुरू म्हणून त्यांनीच मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडील हेच माझ्या आयुष्यात गुरुस्थानी' - जिल्हाधिकारी अभिजित राऊत
- धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित -माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडून मी काहीतरी शिकत असतो. माझे आई-वडील हे माझे पहिले गुरू आहेत. तसेच माझे काका कर्नल पंडित यांनी मला सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, काही वैद्यकीय कारणांमुळे मी सैन्यात जाऊ शकलो नाही.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती गुरूच' - चिन्मय पंडित
- हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी -जीवन जगत असताना प्रत्येकाला गुरू भेटतच असतो, कारण गुरूशिवाय जीवन जगणे हे खरोखरच निरर्थक आहे. गुरूने दिलेली शिकवण आपण जर नेहमीच आचरणात आणत गेलो तर खरोखरच आपण आपले तर भले करू शकतो शिवाय दुसऱ्याचे ही आपल्यापासून भले होते.
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'वडील हेच माझे गुरू' - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
- नांदेड पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर -माझ्या आयुष्यात खरे सांगायचे तर मला प्राथमिक शाळेतच चांगले गुरू लाभले. त्यांच्यामुळेच मला शिक्षणाची खरी गोडी लागली. प्राथमिक शिक्षकाच्या शिकवणुकीची शिदोरी मला आयुष्यभर पुरत आहे
वाचा सविस्तर -गुरुपौर्णिमा विशेष : 'प्राथमिक शिक्षणातील गुरुंच्या प्रेरणेमुळेच आयुष्यातील प्रवास यशस्वी' - विजयकुमार मगर
- वर्धा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली - भाऊ आणि वडील यांच्यामुळेच या पदावर पोहोचलो. पण, या प्रवासात वडिलांनी जगणं शिकवले, तर भावाने यशाचा मार्ग दाखवला. आईची इच्छा म्हणून डॉक्टर झालो. या सगळ्या प्रवासाचे श्रेय शाळेतील गुरूंना आहेच. पण, वडील आणि भाऊ यांचे स्थान गुरू म्हणून श्रेष्ठ असल्याची भावना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बोलून दाखवली.
वाचा सविस्तर -तस्मै श्री गुरवे नमः : वडिलांना पाहून जगणं शिकलो, भावाने यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग दाखवला
- नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे - एकदा माझ्या वर्गातील मुलांनी गोंधळ केला. यात माझे नाव पुढे आल्याने मी सलग १५ दिवस शाळेतच गेलो नाही. तेव्हा वडिलांपर्यंत माझी तक्रार गेली. त्यावेळी वडिलांनी माझी चूक कुठे झाली? याची जाणीव करून दिली.
वाचा सविस्तर -तस्मै श्री गुरवे नमः : 'वडिलांच्या 'त्या' एका शिकवणीमुळे माझे आयुष्य घडले'
- नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय -अगदी लहान वयात गुरूंकडून लाभेलेल्या मार्गदर्शनामुळेच आज जीवनाला पूर्णत्वाचा आकार प्राप्त झाला आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरूंजनांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच आज तब्बल ३० वर्ष पोलीस खात्यात नोकरी केल्याचे समाधान मिळत आहे.
वाचा सविस्तर -तस्मै श्री गुरवे नमः : 'गुरू करो जानके और पानी पियो छानके'
- नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -मी एका खेड्यातून समोर आलो आहे. मी जिल्हा परिषद शाळेतून शिकलो आहे. तेथील शिक्षकांनी मला घडवले. माझे आई-वडील माझे गुरू आहेत. त्यांनी मला घडवले. गुरू खूप पांडित्यपूर्ण असला पाहिजे असा नाही. त्याने संस्कार केले पाहिजे.