नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. आज आसाममध्ये 3 जणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. संबधीत युवक दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती आहे.
दिल्ली पोलिसांनी उधळून लावला दहशतवादी कट , 3 जणांना अटक - दहशतवादी कट उधळून लावला
दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. आज आसाममध्ये 3 जणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला, 3 जणांना अटक
आसाममधील गोलपोरा येथून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शस्त्रास्त्र तसेच स्फोटक पावडर जप्त करण्यात आली आहेत. मुकद्दीर इस्लाम, रंजीत अली आणि जमाल अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे असून तिघेही २५ ते ३० वर्षे वयाचे आहेत.
प्रथम आसाममध्ये एका जत्रेत चाचणीदाखल स्फोट घडवून आणल्यानंतर दिल्लीत त्याचप्रकारे स्फोट घडवून आणायचा असा या तिघांचा कट होता, अशी माहिती उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली.