नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी आज सीबीआय न्यायालयाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी बुधवारी रात्री चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. यावेळी सीबीआयने चौकशीसाठी चिदंबरम यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यावर न्यायालयाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
सीबीआयने ताब्यात घेण्यापूर्वी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. गेल्या 24 तासांमध्ये बरेच काही घडले असून बर्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आरोपी नाही. माझ्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात असून सीबीआय किंवा ईडीकडून कोणतेही आरोपपत्र दाखल नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.