रामपूर - उत्तर प्रदेशातील रामपूर मतदार संघातील सप उमेदवार आझम खान यांनी 'मतदार संघातील मुस्लिमांना मारहाण करण्यात आली. त्यांना मतदान करण्यापासून रोखले गेले' असे आरोप पत्रकार परिषद घेऊन केले आहेत. एका दिवसापूर्वी त्यांना जिल्हा मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षकांनी मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांना मारहाण झाली; त्यांना मतदान करण्यापासून रोखले, आझम खान यांचा आरोप
'मुस्लीमांना ७७ हजार रेड कार्ड देण्यात आली. यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नव्हती. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली. त्यांना मतदान करू दिले नाही. हा आदेश राज्य किंवा केंद्र सरकारकडून काढण्यात आला नव्हता,' असे खान म्हणाले.
आझम खान

तसेच, मुस्लीमबहुल परिसरात सदोष ईव्हीएम मशीन्स देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. खान यांनी रामपूरमध्ये जया प्रदा यांच्याविरोधात निवडणूक लढवली. १८ एप्रिलला येथील मतदान झाले.