नवी दिल्ली -देशाच्या संविधानावर ठरवून हल्ले होत आहेत. आपली लोकशाही इतिहासातील सर्वात कठीण काळातून जात आहे, अशा शब्दात काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सध्याचे केंद्र सरकार व्यवस्थितरित्या सर्वकाही भांडवलदारांच्या हातात देत असल्याचा आरोपही यावेळी सोनिया यांनी केला.
भाजपा पीडितेच्या नव्हे तर गुन्हेगारांच्या बाजूने, हा कुठला राजधर्म?
सध्याचे केंद्र सरकार व्यवस्थितरित्या सर्वकाही भांडवलदारांच्या हातात देत असल्याचा आरोपही यावेळी सोनिया यांनी केला.
भाजपा पीडितेच्या नव्हे तर गुन्हेगारांच्या बाजूने, हा कुठला राजधर्म?
दलितांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कायदा आणि पीडितेची बाजू घेण्याऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहत आहे. गोरगरिबांचा आवाज दाबल्या जात आहे, अशी टीकाही सोनियांनी केली. हाच नवा राजधर्म आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.