नवी दिल्ली -देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. आता योगगुरू रामदेव बाबा यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले असून जेएनयू आणि जामियामधील सीएएविरोधी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर त्यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांनी मोहम्मद अली जीनाप्रमाणे आझादीच्या घोषणा देणे, हे देशविरोधी असल्याचे रामदेव बाबा म्हणाले.
'गांधी,नेहरू आणि भगतसिंग यांच्यासारख्या आजादीच्या घोषणा आपण समजून घेऊ शकतो. मात्र, मोहम्मद अली जीनाप्रमाणे आजादीच्या घोषणा देणे हे देशविरोधी आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.
'विद्यार्थ्यांनी सर्वकाळ आंदोलन करू नये. त्यामुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. देशामध्ये गरिबी, महागाई, बेरोजगारी या मोठ्या समस्या आहेत. त्याविरोधात आपण सर्वांनी उभे राहायला हवे. देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे', असे रामदेव बाबा म्हणाले.