महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात एका जवानाला वीरमरण

By

Published : Jan 24, 2021, 10:00 PM IST

"१८ जानेवारीला पाकिस्तानी सैन्याने अचानक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. जम्मू-काश्मीरच्या सुंदेरबनी भागामध्ये हा हल्ला करण्यात आला. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, यात आपल्या एका जवानाला गोळी लागून तो जखमी झाला होता." असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Soldier injured in Pak ceasefire violation succumbs
सीमेवरील गोळीबारात एका जवानाला वीरमरण

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात देशाचा एक जवान जखमी झाला होता. रविवारी या जवानाला वीरमरण प्राप्त झाले. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

"१८ जानेवारीला पाकिस्तानी सैन्याने अचानक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार सुरू केला. जम्मू-काश्मीरच्या सुंदेरबनी भागामध्ये हा हल्ला करण्यात आला. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, यात आपल्या एका जवानाला गोळी लागून तो जखमी झाला होता." असे या अधिकाऱ्याने सांगितले.

या गोळीबारात जम्मू अँड काश्मीर रायफल्स दलातील नाईक निशांत शर्मा नावाच्या जवानाला गंभीर दुखापत झाली होती. रविवारी कमांड रुग्णालयात उपचारादरम्यान त्याला वीरगती प्राप्त झाली. देशासाठी त्याने केलेले बलिदान हे नेहमीच स्मरणात राहील. असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पाच हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन..

जम्मू-काश्मीरमध्ये २०२० साली पाकिस्तानकडून तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. गेल्या १८ वर्षांमधील ही सर्वोच्च संख्या आहे. या आकडेवारीनुसार, वर्षामध्ये दररोज सुमारे १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

एकूण 36 लोकांचा मृत्यू, १३० जखमी..

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीमध्ये गेल्या वर्षी एकूण १२ नागरिक आणि २४ जवान हुतात्मा झाले. तसेच, एकूण १३० लोक जखमी झाले होते. यामुळे २००३साली करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचा उपयोगच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :नेपाळ : कम्युनिस्ट पक्षाने PM के.पी ओली यांना दाखवला बाहेरचा रस्ता; सदस्यता रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details