श्रीनगर -जम्मू काश्मीर पोलिसांनी तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करत असल्याप्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये ठार झालेल्या एका दहशतवाद्याच्या आईचा आणि खोऱ्यात कार्यरत असलेल्या दुसऱ्या एका दहशतवाद्याच्या बहिणीचा समावेश आहे. कुलगाम जिल्ह्यातून दोघींना अटक करण्यात आल्याची माहिती आज(रविवार) पोलिसांनी दिली.
काश्मिरी तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करत असल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक - दहशतवादी अटक
कोणताही पुरावा नसताना दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पोलीस लक्ष्य करत असल्याचा आरोप जम्मू काश्मीर पोलिसांनी फेटाळून लावला आहे. कायद्याच्या तरदुतींनुसार दहशतवाद्यांना अटक करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
काश्मीर खोऱ्यात दहशतावादी कारवायांत गुंतलेल्या अब्बास शेख याच्या बहिणीला आणि तौसिफ या ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची आई नसीमा बन्नोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 20 जूनला अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दोघींना अटक करण्यात आली आहे. तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी करुन घेण्याचे काम बन्नो करत होती, असे काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले.
कोणताही पुरावा नसताना दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पोलीस लक्ष्य करत असल्याचा आरोप जम्मू काश्मीर पोलिसांनी फेटाळून लावला आहे. कायद्याच्या तरदुतींनुसार दहशतवाद्यांना अटक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबंधी पोलिसांनी ट्विटही केले आहे.