नवी दिल्ली -हवामान बदलाचा अहवाल देणाऱ्या'स्काय मेट' या खासगी संस्थेने देशातील या वर्षीच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता ५० टक्के आहे, असा एक अहवाल त्यांनी दिला आहे. वर्ष २०१२ पासून ही खासगी संस्था अचूक हवामानाचा अंदाज देत आलेली आहे.
या वर्षीही भारताच्या हवामान बदलावर'अल नीनो'चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सरळ परिणाम पर्जन्यावर होणार आहे. त्यामुळे स्काय मेटने अंदाज दर्शवताना अल नीनो प्रभावावरून आपला अंदाज वर्तवला आहे. वर्ष २०१९ मध्ये देशभरामध्ये सामान्य पावसाची शक्यता आहे. मान्सूनची सुरुवात ही मंद गतीने होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळाचे संकेत आहेत. मात्र, त्यानंतर मान्सूनच्या मध्यकाळात पर्जन्याचे प्रमाण ५० टक्के राहण्याची शक्यता आहे.