महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 25, 2020, 3:31 PM IST

ETV Bharat / bharat

ओडिशामध्ये 68 आयपीएल बुकींना अटक

ओडिशा पोलिसांनी गंजम जिल्ह्यातून 14 सट्टेबाजांच्या टोळीचा पर्दाफाश करत 68 लोकांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून या भागात काही बुकी आयपीएलवर बेटिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आयपीएल सट्टेबाजी न्यूज
आयपीएल सट्टेबाजी न्यूज

भुवनेश्वर -ओडिशा पोलिसांनी गंजम जिल्ह्यातून 14 सट्टेबाजांच्या टोळीचा पर्दाफाश करत 68 लोकांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून या बागात काही बुकी आयपीएलवर बेटिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सध्या यूएईमध्ये आयपीएलचे क्रिकेट सामने सुरू आहेत. यावरती देशभरातील अनेक राज्यांमधील बुकींकडून सट्टा लावला जात आहे. तसेच, हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाणही होत आहे.

हेही वाचा -जयपूर : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी 4 जणांना अटक, 4.19 कोटींची रोकड जप्त

गंजमचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार राय यांनी सांगितले की, दुर्गापूजेदरम्यान करण्यात आलेल्या विशेष कारवाईदरम्यान एकूण 1.53 लाख रुपये रोख, चार मोबाइल फोन आणि चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गंजम पोलिसांनी गेल्या काही दिवसांत अनेक आयपीएल सट्टेबाजांच्या रॅकेटचा भंडाफोड करून त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा -अयोध्येत 17 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details