नवी दिल्ली - सियाचीनमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. हिमस्खलन होऊन कडा कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हे हिमस्खलन झाले.
सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू
सियाचीनमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. हिमस्खलन होऊन कडा कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हे हिमस्खलन झाले.
सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू
सीयाचीन हे समुद्रसपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर आहे. अचानक हिमस्खलन झाल्याने डोग्रा रेजिमेंटचे 6 जवान आणि 2 हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यामध्ये 4 जवानांचा तर 2 हमालांचा मृत्यू झाला. सैनिकांनी घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरु केले आहे. सियाचीनमध्ये शत्रूपेक्षा वातावरणाची जास्त भीती असते. हिवाळ्यात हिमस्खलनाचे जास्त प्रकार घडतात.
Last Updated : Nov 19, 2019, 7:52 AM IST