महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या - ओडिशा क्राईम न्यूज

मृतांमध्ये पती बुलू जानी, पत्नी ज्योती जानी, मुलही सरिता जानी, तीन लहान मुले संजीव जानी, श्रीया जानी आणि विधिमा जानी यांचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ओडिशा क्राईम न्यूज
ओडिशा क्राईम न्यूज

By

Published : Nov 11, 2020, 7:46 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाच्या बालागीर जिल्ह्यातील गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. यातील चौघांचे मृतदेह शहरातील ब्रह्मपुरा येथून ताब्यात घेण्यात आले. या घटनेत पती-पत्नीसह त्यांची चार मुले मृतावस्थेत आढळली.

हेही वाचा -कोविड काळात गर्भवती मातांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

पाटणगड पोलीस ठाण्यांतर्गत सानरापाडा गावात हे भीषण हत्याकांड घडले आहे. सहा जण त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये पती बुलू जानी, पत्नी ज्योती जानी, मुलही सरिता जानी, तीन लहान मुले संजीव जानी, श्रीया जानी आणि विधिमा जानी यांचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बोलांगीरचे पोलीस अधीक्षक मडकर संदीप संपत म्हणाले की, प्राथमिक तपासात या सर्वांची हत्या धारदार शस्त्राने झाल्याचे दिसत आहे. चौकशीसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -कर्नाटकातील दहशतवाद्याचे बंगाल कनेक्शन; 'हनीट्रॅप'मधल्या तानिया प्रवीणच्या संपर्कात

ABOUT THE AUTHOR

...view details