महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक! जमीनीच्या वादातून महिलेची हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल - जमीनीच्या वादातून महिलेची हत्या

मृत महिला तीन वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती एकटीच या घरात राहात होती. आरोपी मोनूला तिच्या घरावर कब्जा करायचा होता. याच कारणामुळे त्याने महिलेची हत्या केली असल्याचे समोर येत आहे. तर, या महिलेनेच आपल्या घरावर कब्जा केला असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.

जमीनीच्या वादातून महिलेची हत्या
जमीनीच्या वादातून महिलेची हत्या

By

Published : Apr 17, 2020, 11:36 AM IST

कासगंज- उत्तरप्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील कोतवाली क्षेत्रातील होडलपूर गावात एका दिव्यांग व्यक्तीने महिलेची गोळी मारुन हत्या केली आहे. जमीनीच्या वादातून हा प्रकार घडला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार शेजारच्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेदरम्यान महिलेला मदत करण्याऐवजी घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये 62 वर्षीय जामवती नामक महिला आपल्या घराबाहेर बसली आहे. यावेळी तिचा शेजारी मोनू याने तिला गोळी घालून ठार केले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील प्रत्येक घराची तपासणी करत आरोपीला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला तीन वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती एकटीच या घरात राहात होती. आरोपी मोनूला तिच्या घरावर कब्जा करायचा होता. याच कारणामुळे त्याने महिलेची हत्या केली असल्याचे समोर येत आहे. तर, या महिलेनेच आपल्या घरावर कब्जा केला असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.

यावर प्रतिक्रिया देताना एडीजी अजय आनंद म्हणाले, की या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. तसेच, गुन्हा करणाऱ्या आरोपीला रोखण्याऐवजी घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details