महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मालाड दुर्घटना एक अपघात -संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबईत काही ठिकाणी अवैध बांधकामे चालू आहेत. त्यावर मुंबई महानगरपालिका काहीही करू शकत नाही, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

By

Published : Jul 2, 2019, 12:27 PM IST

Updated : Jul 2, 2019, 3:55 PM IST

संजय राऊत

मुंबई- पश्चिम उपनगरातील पिंपरीवाडा, मालाड येथे भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ५२ जण जखमी झाले आहेत. यावर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआय ट्विट

संजय राऊत म्हणाले, मालाडमध्ये घडलेली दुर्घटना ही अतिवृष्टीमुळे घडली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेची कोणतीही चूक नव्हती. हा एक अपघात होता. मुंबईत काही ठिकाणी अवैध बांधकामे चालू आहेत. त्यावर मुंबई महानगरपालिका काहीही करू शकत नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही मालाडची दुर्घटना घडल्याची घटना घडली. दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाची तुकड्या घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेबद्दल दुख: जाहीर करताना मृताच्या कुटुंबियांनी ५ लाख मदतीची घोषणा केली आहे.

Last Updated : Jul 2, 2019, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details