नवी दिल्ली -काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बुधवारी झालेली बैठक ही किमान समान कार्यक्रम यासाठी होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा निर्णय पक्का झालेला आहे. राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार बनेल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा.. मोदी-पवार बैठक पूर्ण, ४५ मिनिटे सुरू होती चर्चा..
डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल. बुधवारी आघाडीतील पक्षांची दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी महत्वाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर फोनवरून चर्चा केली आहे. तसेच त्यांच्यात झालेली बैठक ही किमान समान कार्यक्रमावर झाली होती, असे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बैठकीनंतर सांगितले आहे. तसेच ही बैठकी सकारात्मक झाली असून, लवकरच अंतिम निर्णयापर्यंत तीनही पक्ष पोहोचतील. आणि डिसेंबर उजाडण्यापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात मजबूत सरकार स्थापन होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.