महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी धुतले 'यांचे' पाय

शिवराज सिंह चौहान आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे भाजपचे सदस्यत्व आभियान राबवत आहेत.

शिवराज सिंह चौहान

By

Published : Jul 14, 2019, 7:11 PM IST

विजयवाडा -मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे भाजपचे सदस्यत्व अभियान राबवत आहेत. यावेळी त्यांनी जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे पाय धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शिवराज सिंह चौहान यांनी जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवास राव यांचे पाय धुतले आहेत. याचबरोबर त्यांनी भाजपचे सदस्य अभियान यशस्वी व्हावे यासाठी राव यांना पक्षात प्रवेश करण्याची विनंती ही केली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत यशानंतर पक्ष संघटना पुन्हा कामाला लागली आहे. संपूर्ण देशभरात भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. राज्यात बुथ स्तरापासून संघटनेची पुनर्रचना करण्यात येत आहे. महासंपर्क अभियानातून पक्ष आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details