मंगरूळ - प्राण्यांवर जिवापाड प्रेम असणाऱ्या लोकांबाबत आपण ऐकतो. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी लढणाऱ्या अनेकांबाबत आपण वाचतो, समाज माध्यमांवर बघतो. अशीच एक कहाणी आहे मंगरूळच्या नम्रता प्रभू आणि ६४ कुत्र्यांची. ती दररोज न चुकता या कुत्र्यांना दिवसातून दोनवेळा खायला घालत असते.
रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण खाऊ घालणारी नम्रता मंगरूळची नम्रता ही एक चित्रकार आहे. ती गेल्या २ वर्षांपासून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालत आहे. तिचा हा दररोजचा ठरलेला उपक्रम आहे. ती दिवसातून दोनदा या कुत्र्यांना खाद्य वाटत असते. ती रोज आपल्या स्कूटरवर जेवणाचे डबे घेऊन परिसरातील १३ भागांमध्ये जाऊन या कुत्र्यांना भरवत असते. शहरातील जवळपास ६४ कुत्र्यांना ती दररोज न चुकता खायला घालत असते. तिची या मुक्या प्राण्यांवरची माया अनेकांना अचंबित करणारी आहे. काही जणांनी तिच्या या कार्याचे कौतुक केले तर, काहींच्या विरोधाला तिला सामोरे जाव लागलं. मात्र, ती आपल्या उद्देश्यावर कायम राहिली.
हेही वाचा - देशातील राज्ये आर्थिक संकटात..
नम्रताच्या म्हणण्यानुसार, तिच्या घराजवळ एक हॉटेल होते, जे उरलेले अन्न कुत्र्यांना टाकत असे. मात्र, ते काही कारणास्तव २ वर्षांपूर्वी ते बंद झाले. त्यानंतर ती जागा खाली करण्यात आली. परंतु, कुत्री दररोज त्या जागेवर येवून बसायची. यातच एका कुत्रीने ५ पिलांना जन्म दिला यातील ३ पिलांना कोणीतरी नेले. मात्र उर्वरित २ पिले भुकेने ओरडत होती, त्यामुळे त्यांनी त्या पिलांना दूध घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्या तिथे बसलेल्या सर्व कुत्र्यांना खायला देऊ लागल्या. मात्र, त्यांच्या या कार्याला आसपासचे लोक विरोध करू लागले, त्यांच्या घरचेही नाराज झाले. चांगल्या घरच्या लोकांनी असे रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालणे शोभा देत नाही, असे त्यांच्या माहेरच्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी हा उपक्रम २ महिन्यांआधी थांबवला होता. मात्र, त्यानंतर त्यांना ही तळमळ अस्वस्थ करत असे, म्हणून त्यांनी परत हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या कामात त्यांची मुलगीही सहभागी झाली.
हेही वाचा - सरकारच्या 'हमीभावा'नेही शेतकऱ्यांचा फायदा नाहीच!
आज नम्रता आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढत दररोज न चुकता या कुत्र्यांना खायला देत असते. या कुत्र्यांच्या खाण्यात भात, पाणी, दही यासारख्या गोष्टी असतात. तर, कधी-कधी पनीर, चिकनचाही समावेश ती करत असते. प्राण्यांनाही भावना असतात. ती माणसांसारखी बोलू शकत नाहीत. मात्र, त्यांच्या वागणूकीतून ते भाव जाणवतात. नम्रताच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात आणि या कुत्र्यांमध्ये एक वेगळे भावनिक नाते निर्माण झाले आहे. ही माझी नाही तर देवाची इच्छा असल्याचे त्या म्हणतात. २ वर्षांपूर्वी एका हॉटेलपासून सुरू झालेला हा प्रवास त्यांना आता कुठेच थांबवायचा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - प्रत्येक शाळेमध्ये संगीत शिकवल्यास हिंसाचाराचे प्रमाण कमी होईल - इल्लैया राजा