नवी दिल्ली -जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. काही पाकिस्तानी समर्थकांनी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', असे नारे दिले.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह गेल्या होत्या. यावेळी पाकिस्तानी समर्थकांनी भारतविरोधात निदर्शने सुरू केली. 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', असे नारे हे समर्थक देत होते. यावेळी शाझिया इल्मी आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून इल्मी यांनी 'भारत जिंदाबाद'चा नारा लावला.