महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेरा जादू चल गया! मोदी-ट्रम्पच्या भेटीवर शत्रुघ्न सिन्हाचे टि्वट - Meet

फ्रान्समधील जी-७ परिषदेमध्ये  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.

मोदी-ट्रम्पच्या भेटीवर शत्रुघ्न सिन्हाचे टि्वट

By

Published : Aug 28, 2019, 2:19 PM IST

नवी दिल्ली - फ्रान्समधील जी-७ परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी काश्मीरप्रश्न मोदी चांगल्या प्रकारे हाताळतील", असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. यावर भाजपवर कडाडून टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींचे कौतुक केले आहे.


'फ्रान्समधील जी-७ परिषद तुम्ही खुप चांगल्या प्रकारे हाताळली असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतची तुमची मैत्री अगदी उघडपणे सर्वांना पाहायला मिळाली. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या मुत्सद्देगिरीला यश आले. जरी तो चित्रपट चालला नसला तरी मात्र तुमची जादू चालली', असे सिन्हा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


यापुर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची प्रशंसा केली होती. 'मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे अतिशय धैर्यवान, संशोधन केलेले आणि विचारपूर्ण होते. देशातील मुख्य समस्या त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडल्या', असे सिन्हा यांनी टि्वट करून म्हटले होते.


शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा मोदी सरकारच्या कार्यपद्धतीला विरोध करताना थेटपणे पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details