नवी दिल्ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मोदींनी चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करायला हवी, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते मोदींच्या प्रेमात; म्हणाले... 'मोदींना खलनायक ठरवणे अयोग्य'
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
'मी गेल्या 6 वर्षापूर्वी म्हटले होते की, जर मोदींनी चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करायला हवी. इतर नेते ही गोष्ट मान्य करत आहेत, याचे मी स्वागत करतो', असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.
जगासमोर नरेंद्र मोदींना खलनायक ठरवणे चुकीचे असून त्यांना अयोग्य ठरवून विरोधक त्यांची मदत करत आहेत. कामाचे मुल्यांकन व्यक्ती केंद्रीत नव्हे तर मुद्द्यांवर असायला हवे, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले आहेत. तर मोदींनी केलेल्या कामांचे महत्त्व कमी केल्याने त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी म्हटले.