नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करत 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता दिवे लावण्याच आवाहन केले आहे. कोरोना विरोधातील लढाई लढताना देशवासी एकजूट असल्याचा संदेश यातून देण्यात येणार आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदींच्या आवाहानावर मत व्यक्त केले आहे.
'देशवासियांच्या एकतेसाठी मी 5 एप्रिलला दिवा पेटवेल, पण...' - कोरोना बातमी
खूप सारे बोलण्यासारखे विषय होते, त्यावर मोदीजी बोलतील असे देशवासियांना वाटत होते, मात्र, मोदी फक्त दिवा लावण्यावरच बोलले - शशी थरूर
मी देशवासियांच्या एकतेसाठी दिवा लावेल. मात्र, खूप सारे बोलण्यासारखे विषय होते, त्यावर मोदीजी बोलतील असे देशवासियांना वाटत होते, मात्र, मोदी फक्त दिवा लावण्यावरच बोलले. हे निराशाजनक आहे, असे म्हणत शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली.
देशामध्ये 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्यानंतर त्या त्या राज्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावयाचा आहे. ज्या भागांमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार झाला आहे, त्या परिसराला हॉटस्पॉट घोषित करून इतर भागातील बंदी उठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.