नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूच्या प्रसारसाठी एका समुदायाला दोष देणे योग्य नाही, असे सांगितले. आपले सर्व लक्ष कोरोनाचा प्रसार थांबवण्याकडे असावे, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनचे 21 दिवस पूर्ण झाल्यानतंतर काही क्षेत्रांमधील निर्बंध काढले पाहिजेत, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्याद्वारे कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येला धार्मिक रंग देऊन दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.