इंदूर -अभिनेत्री शबाना आझमी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'आज परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जी व्यक्ती सरकारविरोधात बोलेल त्या व्यक्तीला देशविरोधी ठरवलं जातयं', असे त्या म्हणाल्या आहेत. इंदोर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
'आपल्या देशाच्या चांगल्यासाठी आपण देशात होत असलेल्या चुकीच्या गोष्टीवर बोलणे गरजेचे आहे. जर आपण बोललो नाही, तर परिस्थितीमध्ये बदल कसा घडेल. देशभरात गंभीर वातावरण तयार झाले आहे. जो सरकारविरोधात बोलेल त्याला देशविरोधी म्हटलं जात आहे. मात्र आपण या गोष्टींना घाबरायला नको, यांच्या कुठल्याच प्रमाणपत्राची आपल्या गरज नाही'. असेही त्या म्हणाल्या.