पुणे : ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोनावरील लसीची चाचणी भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात येत आहे. या लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या पार पडल्या असून, आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुण्याच्या ससून रुग्णालयातून सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली.
ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. "यासाठी ज्यांना नाव नोंदणी करायची आहे, त्यांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा - 8550960196, 8104201267" असे आवाहन रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.