महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2021, 7:26 PM IST

ETV Bharat / bharat

'वा पांडेजी'! एकट्या बालमुरुगन यांनी 50 पैकी 43 बेपत्ता व्यक्ती शोधून काढल्या

पल्लडम पोलीस ठाण्यातील वरिष्ठ हवालदार बालामुरुगन यांनी 50 प्रकरणांपैकी 43 बेपत्ता व्यक्ती शोधून काढल्या आहेत. 43 व्यक्तींना त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले आहे.

बालामुरुगन
बालामुरुगन

थ्रीसूर - हरवलेली व्यक्ती लहान असो किंवा मोठी, ती गायब होणे कुटुंबावर आघातच आसतो. हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. तिरुपूर पोलीस विभागाने हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे. हरवलेल्या व्यक्तींची प्रलंबित प्रकरणे तिरुपूरमधील पल्लडम पोलीस ठाण्यातील वरिष्ठ हवालदार बालामुरुगन यांच्याकडे देण्यात आली होती.

बालामुरुगन यांनी हरवलेल्या प्रकरण सोडवण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये पल्लडम पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला, मुले व मुलींसह एकूण 50 प्रकरणांची नोंद झाली होती. बालामुरुगन यांनी 50 प्रकरणांपैकी 43 बेपत्ता व्यक्ती शोधून काढल्या आहेत. 43 व्यक्तींना त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले आहे.

तिरुपूर जिल्हा पोलीस अधीक्षक, दिशा मित्तल यांनी बालामुरुगन यांचे कौतुक केले. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मी बर्‍याच जिल्ह्यांमध्ये व इतर राज्यात गेलो. बहुतेकदा किशोरवयीन मुलांच्या हरवलेल्या घटना आमच्या स्टेशनमध्ये नोंदवल्या जातात. मी यापूर्वी गुन्हे शाखेत कार्यरत होतो. त्यामुळे हरवलेल्या व्यक्ती शोधणे मला सोपे गेले. मी 17 वर्षांची मुलगी आणि एक 18 वर्षाची मुलगी शोधण्यासाठी अशा दोन स्वतंत्र प्रकरणात केरळला गेलो. त्या काळात, चौकशी दरम्यान मला काही अविस्मरणीय अनुभव आले, असे बालमुरुगन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details