महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडू; पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा रद्द... - सहामाई परीक्षा रद्द

परीक्षा घ्याव्यात की नाही, हा निर्णय घेण्यासाठी उत्तस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दवी आणि पदयुत्तर अभ्यासक्रमांच्या सहामाई परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 23, 2020, 4:09 PM IST

Updated : Jul 23, 2020, 4:56 PM IST

चेन्नई - तामिळनाडू सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना पुढील वर्षात विना परीक्षा प्रवेश दिला जाणार आहे, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी ही माहिती दिली.

परीक्षा घ्याव्यात की नाही, हा निर्णय घेण्यासाठी उत्तस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि ऑल इंडिया तत्रंशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कला, विज्ञान, इंजिनिअरिंग, कॉम्युटर सायन्समधील कोर्सेसेच्या या वर्षातील प्रथम सत्र परीक्षा होणार नाहीत, असे पलानीस्वामी म्हणाले.

मागील आठवड्यात 755 विद्यापीठांनी परिक्षांसदर्भातील माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवली होती. सहामाई आणि वार्षिक परीक्षा घेण्यासंबंधी युजीसीने 6 जुलैला सुधारीत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार विद्यापीठांनी युजीसीला स्थितीचा आढावा दिला. देशात कोरोनाचा प्रसार मार्चमध्ये झाल्यापासून सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहे. त्यामुळे देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा खोळंबून पडल्या आहेत.

Last Updated : Jul 23, 2020, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details