श्रीनगर - मागील 12 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू आहे. मात्र, किश्तवार जिल्ह्यामध्ये आज (शनिवार) दिवसभरासाठी संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. कलम १४४ हटवण्यात आल्यामुळे लोक घराबाहेर पडू शकतात तसेच एकत्र येण्याची मुभाही नागरिकांना मिळाली आहे.
किश्तवारमध्ये संपूर्ण दिवसभरासाठी संचारबंदी उठवली - संचारबंदी उठवली
किश्तवार जिल्ह्यामध्ये आज (शनिवार) दिवसभरासाठी संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने काश्मीर राज्याची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित घटना घडू नये म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. काश्मीरचे मुख्य सचिव बी. एस सुब्रम्हण्यम यांनी टप्याटप्याने सर्व सेवा सुरळीत करणार असल्याचे काल (शुक्रवारी) पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यांनतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. जम्मू, रेसाई, सांबा, कठुआ आणि उधमपूर क्षेत्रातील २ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.