लखनऊ -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या काळात बरेच औद्योगिक व्यावसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांनी जीवनावश्य वस्तुंशी संबधित उद्योग नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानुसार, स्टिल इंडस्ट्री, रिफायनरी उद्योग, सिमेंट उद्योग, रसायन उद्योग, पेपर उद्योग, टायर उद्योग, आणि साखर मिल यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी, मुख्य सचिवाचे आदेश - news about industry in up
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांनी जीवनावश्य वस्तुंशी संबधित उद्योग नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानुसार, स्टिल इंडस्ट्री, रिफायनरी उद्योग, सिमेंट उद्योग, रसायन उद्योग, पेपर उद्योग, टायर उद्योग, आणि चीनी मिल यांचा समावेश आहे.
राजेंद्र कुमार यांनी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हे आदेश दिले आहेत. हे उद्योग धंदे आवश्यक नियम पाळून सुरू करण्यात यावे, असे या पत्रात नमूद आहे. हे आदेश फक्त उद्योगधंदे सुरू करण्यापुरतेच मर्यादित आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून जिल्ह्यात वाहतुक बंदी आहे. तसेच ज्या परिसरातील उद्योग सुरू होणार आहेत, तो परिसर सॅनिटाईझ करून घ्यावा. तसेच, कामाच्या ठिकाणी मजुरांच्या संख्येनुसार स्क्रिनिंगसाठी थर्मल स्कॅनरची सुविधा करण्यात यावी, हे देखील सांगण्यात आले आहे.
औद्योगिक व्यवस्थापन राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत आहेत की नाही, याची जिल्हा प्रशासकीय वैद्यकीय विभागाचे अधिकारी याची देखरेख करतील, असेही राजेंद्र यांनी म्हटले आहे.