नवी दिल्ली -फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात पोहोचली आहे. फ्रान्समधून नॉन-स्टॉप उड्डाण केल्यावर बुधवारी रात्री आठ वाजता राफेल विमानेची दुसरी तुकडी भारतात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने बुधवारी दिली.
फ्रान्समधील इस्ट्र्रेसहून गुजरातमधील जामनगर येथे तीन नवीन विमाने दाखल झाली. या प्रवासादरम्यान फ्रेंच एअर फोर्सचे उड्डाणादरम्यान इंधन भरणारे (मिड एयर रिफ्यूलिंग) विमानही सोबत होते. फ्रान्समधील सेंट डायझियर रॉबिन्सन एअरबेसवर या प्रवासासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
सहायक चीफ ऑफ एअर स्टाफ (प्रोजेक्ट) यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची टीम तीन लढाऊ विमान घेण्यासाठी लॉजिस्टिक मुद्द्यांवर समन्वय साधत आहे.
हेही वाचा -सैन्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी जवानांचे निवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव