महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2020, 1:45 PM IST

ETV Bharat / bharat

अफगाण हिंदू अन् शिखांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल

आज अल्पसंख्याक हिंदू आणि शीख समुदायाच्या 48 सदस्यांना घेऊन भारतात दुसरी तुकडी दाखल झाली. भारत सरकारच्या विशेष विमानाने हे सर्व नवी दिल्लीत दाखल झाले. यामध्ये महिला आणि मुले यांचाही समावेश आहे.

अल्पसंख्याक हिंदू आणि शीख
अल्पसंख्याक हिंदू आणि शीख

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात शीख समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि हिंसा होत आहे. तेथील शीख समुदाय आणि अल्पसंख्याक हिंदूना भारतात आणले जात आहे. आज अल्पसंख्याक हिंदू आणि शीख समुदायाच्या 48 सदस्यांना घेऊन भारतात दुसरी तुकडी दाखल झाली. भारत सरकारच्या विशेष विमानाने हे सर्व नवी दिल्लीत दाखल झाले. यामध्ये महिला आणि मुले यांचाही समावेश आहे.

25 मार्चला काबूल येथील शीख गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 शीख मारले गेले होते. हा हल्ला इसीस या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. या हल्ल्यांमध्ये आपले प्राण गमावलेल्या शीख कुटुंबातील सदस्यांचाही या तुकडीत समावेश आहे. तर यापूर्वी 11 सदस्यांची पहिली तुकडी 26 जुलैला नवी दिल्ली येथे दाखल झाली होती.

दरम्यान, आज दाखल झालेल्या तुकडीतील सदस्यांना काबुलमधील भारतीय दूतावासाने अल्पकालीन व्हिसा मंजूर केला आहे. भारत सरकारच्या कोरोना प्रोटोकॉलनुसार या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची मुक्कामाची व्यवस्था दिल्ली शिख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी (डीएसजीएमसी) द्वारे करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूल येथे एका बंदुकधारी व्यक्तीने आणि आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मस्थळ असणाऱ्या एका गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 25 शीख मारले गेले होते. हा हल्ला इसीस या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. मागील काही काळांमध्ये अफगाणिस्तानमधील शीख समुदायावर झालेला हा सर्वात भीषण हल्ला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details