श्रीनगर (जम्मू काश्मीर) - हंगामाच्या पहिल्या बर्फवृष्टीने शनिवारी काश्मीर खोऱ्यात जोरदार हजेरी लावली. जम्मू-काश्मीरच्या उंच भागांत जोरदार बर्फवृष्टी झाली, अशी माहिती हवामान कार्यालयाने दिली आहे. हिमवृष्टीनंतर तापमानही खाली गेले.
'अपेक्षेप्रमाणे रात्रीच्या वेळी काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत हलका ते मध्यम हिमवर्षाव झाला. तर, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उंचावरील भागांत जोरदार हिमवृष्टी झाली,' हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.' आजपासून येत्या काळात हवामान स्थितीत सुधारणा होईल.
हेही वाचा -प्रमुख दक्षिण भारतीय शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली; मात्र, डब्ल्यूएचओ मानकांनुसार प्रदूषितच
20 डिसेंबरपर्यंत मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यादरम्यान हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी श्रीनगरमध्ये 8 सेंटीमीटर बर्फ पडला. शनिवारी श्रीनगर-जम्मू, श्रीनगर-लेह आणि मुगल रोडसह सर्व प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.
पर्यटनस्थळ पहलगाम येथे 15 इंच बर्फवृष्टी झाली, तर गुलमर्ग येथे 21.6 सेंटीमीटर हिमवर्षाव आणि कुपवाडामधील डोंगराळ भागांत 4 सेंटीमीटर बर्फवृष्टी नोंदविण्यात आली.
श्रीनगर-जम्मू महामार्गावरील बन्निहाल सेक्टरमध्ये ताजी बर्फवृष्टी झाली. तर, काझीगुंड येथे 4 सेंटीमीटर व बनिहाल येथे 1.8 सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.
शनिवारी श्रीनगरमध्ये 0.6 अंश सेल्सिअस, पहलगाममध्ये ऋण 0.9 आणि गुलमर्ग येथे शून्याखाली 4 अंश सेल्सियस किमान तापमान होते. शनिवारी लडाखच्या लेह शहरात किमान तापमान ऋण 6.1, कारगिल ऋण 3 व द्रास येथे ऋण 6.3 एवढे किमान तापमान नोंदले गेले. जम्मू शहरात रात्रीचे सर्वात कमी तपमान म्हणून 10.3, कतरामध्ये 8.6, बटोटे येथे ऋण 0.7, बन्निहाल येथे 0.2 आणि भादरवाह येथे उणे 0.4 अंश सेल्सियसची नोंद झाली.
शुक्रवारी दुपारपर्यंत श्रीनगर शहरात हवामान स्वच्छ होते. मात्र, वातावरणात अचानक बदल झाला.
हेही वाचा -राजस्थान : तांत्रिकाने बालिकेसह स्वतःला जाळले, अंधश्रद्धेतून प्रकार घडल्याची चर्चा