पोर्ट ब्लेअर - कोरोनासंबधी वादग्रस्त ट्विट केल्यामुळे अंदमान निकोबार येथे एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांने जर कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला तर कुटुंबातील सदस्यांनाही क्वारंटाईन का करता? असा सवाल त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला केला होता. अफवा पसरवत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी झुबेर अहमद या पत्रकाराला अटक केली आहे. तो 'लाईट ऑफ अंदमान' या दैनिकात कार्यरत आहे. 27 एप्रिल रोजी बांबूफ्लॅट पोलिसांनी झुबेरवर गुन्हा दाखल केला आहे.
काय ट्विट केलं होत झुबेर अहमदने ?