पटना - भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका खासगी शाळेची बस कालव्यात पडली. बिहारच्या अररिया जिल्ह्यातीस मोहनिया या गावात ही घटना घडली. या बसमध्ये १६ विद्यार्थी असल्याची महिती समोर येत आहे.
बिहारमध्ये शाळेची बस कालव्यात कोसळली, विद्यार्थ्यांचा शोध सुरू - बिहार
या बसमध्ये १६ विद्यार्थी होते. बसमधील काही विद्यार्थांना बाहेर काढण्यात आले आहे.
बिहारमध्ये शाळेची बस कालव्यात पडली
आररिया जिल्ह्यातील पलासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहनिया गावानजीक भरधाव ट्रकने शाळेच्या बसला धडक दिली. या धडकेमुळे ही बस खोल कालव्यात कोसळली. या बसमध्ये १६ विद्यार्थी होते. या अपघातातील काही विद्यार्थांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, काही विद्यार्थी अजूनही बेपत्ताच आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.