महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रशांत भूषण यांना अवमान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून एक रुपयाचा दंड - SC imposes fine to Prashant Bhushan

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना माफी मागण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला होता. त्यावर भूषण यांनी माफी मागणे हा माझ्या विवेकाचा अपमान असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना आज दंड ठोठावला आहे.

प्रशांत भूषण
प्रशांत भूषण

By

Published : Aug 31, 2020, 12:42 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांना आज सर्वोच्च न्यायालयाने १ रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत भरला नाही तर त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच तीन वर्षे वकिली करता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना माफी मागण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला होता. त्यावर भूषण यांनी माफी मागणे हा माझ्या विवेकाचा अपमान असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना आज दंड ठोठावला आहे. या निकालकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

काय म्हणाले होते प्रशांत भूषण?

वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याबद्दल केलेल्या ट्विटबाबत माफी मागण्यास नकार दिला होता. जर विधान मागे घेतले तर माझ्या विवेकाचा आणि मला सर्वोच्च आदर वाटत असलेल्या संस्थेचा अवमान होईल, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले होते. भूषण यांना अवमान केल्याप्रकरणी सू मोटोद्वारे दाखल केलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. प्रशांत भूषण म्हणाले होते, की माझे ट्विट हे गुणवत्तेबाबतचा विश्वास व्यक्त करतात. त्यावर मी ठाम आहे. हा विश्वास जाहीरपणे व्यक्त करणे, ही माझी नागरिक म्हणून उच्च अशी जबाबदारी आहे. तसेच न्यायालयाचा कायदेशीर अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे असा विश्वास व्यक्त केले असताना अटीवर अथवा विनाअट माफी मागणे हे अप्रामाणिक ठरणार आहे.

काय आहे अवमान प्रकरण-

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायधीशांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी १४ ऑगस्टला दोषी ठरवले होते. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीस ६ महिने तुरुंगवास किंवा २ हजार रुपये दंड दिला जातो. काही प्रकरणात दोन्हीही शिक्षा दिली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details