महाराष्ट्र

maharashtra

रंजन गोगोई यांच्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By

Published : Aug 21, 2020, 3:56 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी प्रमुख न्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात दाखल झालेली याचिका फेटाळली आहे. संबंधित याचिका ही दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये दाखल झाली होती. गेल्या एक वर्षात या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली नाही.

रंजन गोगोई
रंजन गोगोई

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात दाखल झालेली याचिका फेटाळली आहे. रंजन गोगोई यांच्या कार्यकाळादरम्यानच्या कामकाजाची इनहाऊस चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. रंजन गोगोई यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे या याचिकेत म्हटले होते.

संबंधित याचिका ही 2018 मध्ये दाखल झाली होती. गेल्या एक वर्षात या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली नाही. गोगोई निवृत्त झाले असून, ही याचिका निष्प्रभावी झाली आहे, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. 2016 मध्ये रंजन गोगोई यांनी काही प्रकरणात एकतर्फी निकाल दिल्याचेही याचिकेत म्हटले होते.

65 वर्षींय रंजन गोगोई हे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि लगेच चार महिन्यात त्यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक अतिमहत्त्वाच्या खटल्यांचा निकाल दिला आहे. या खटल्यांमध्ये बाबरी मशीद जमीन वाद, शबरीमाला मंदिराचा खटला, राफेल खटला, राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' टिप्पणीसंदर्भातील खटला, २०१७ च्या वित्त कायद्याची वैधता आणि सरन्यायाधिशांच्या कार्यालयावरील माहिती अधिकाराच्या अर्जाचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details